Share

“मर्डर करा, पण माघार घेणार नाही”; भाजपच्या नवनाथ बन यांच्यासाठी अपक्ष उमेदवाराला थेट ‘पोलिसी’ धमकी?

Independent candidate Lalu Bhai Verma alleges life threats and police pressure to withdraw nomination in favor of BJP’s Navnath Ban in Mankhurd.

Published On: 

Independent candidate Lalu Bhai Verma alleges life threats and police pressure to withdraw nomination in favor of BJP's Navnath Ban in Mankhurd.

🕒 1 min read

मुंबई – राजकारणात विजयासाठी साम-दाम-दंड-भेद वापरला जातो, हे आपण ऐकून असतो. पण सत्तेचा वापर करून थेट पोलिसांच्या मदतीने उमेदवारांचे अपहरण केले जात असेल तर? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशाच एका धक्कादायक प्रकाराची चर्चा सुरू आहे. मुंबईत चक्क एका अपक्ष उमेदवाराला मध्यरात्री उचलून नेऊन धमकावल्याचा आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मानखुर्दमध्ये भाजप उमेदवार नवनाथ बन (Navnath Ban) यांच्या विजयासाठी प्रशासकीय यंत्रणेचा आणि ‘मोठ्या’ नेत्यांच्या नावाचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार लालू भाई वर्मा यांनी केला आहे.

Mankhurd Election | Lalu Bhai Verma vs Navnath Ban

“रात्री १२ वाजता पोलीस घरी आले…”

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात लालू भाई वर्मा (Lalu Bhai Verma) हे भाजप नेत्यांसमोर अक्षरशः संतापाने थरथरताना दिसत आहेत. वर्मा यांनी केलेल्या दाव्यानुसार, “रात्री १२ वाजता पोलीस माझ्या घरी आले. मला उचलून नेण्यात आले. माझे घराचे दरवाजे रात्रभर वाजवले गेले.”. विशेष म्हणजे, भाजप नेते किरीट सोमैया, मनोज कोटक आणि अमित साटम यांनी आपल्याला भेटून दबाव टाकल्याचा आरोप वर्मा यांनी केला आहे.

“गाडीत चरस-गांजा ठेवण्याची धमकी”

उमेदवारी मागे घेतली नाही तर, “माझ्या गाडीत चरस, गांजा किंवा अफू ठेवून मला खोट्या गुन्ह्यात अडकवले जाईल,” अशी धमकी दिल्याचा खळबळजनक दावा वर्मा (Lalu Bhai Verma) यांनी केला आहे. पोलिसांच्या मदतीने दबावतंत्र वापरले जात असल्याने लोकशाही जिवंत आहे का? असा सवाल आता उपस्थित होतोय.

“मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन धमकावताय?”

व्हिडिओमध्ये लालू भाई वर्मा यांचा आक्रमक अवतार पाहायला मिळत आहे. ते नवनाथ बन (Navnath Ban) आणि उपस्थित नेत्यांना उद्देशून म्हणतात, “तुम्ही मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन धमकावताय? मग माझा थेट मर्डरच करा, माझ्या मुलाबाळांना संपवा, पण मी निवडणूक लढणारच.”. २०१७ मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या वर्मा यांची ताकद पाहून भाजपचं टेन्शन वाढल्याचं आणि त्यातूनच हे प्रकार घडत असल्याचं बोललं जातंय. अद्याप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही, पण या ‘हायव्होल्टेज ड्रामा’मुळे मानखुर्दचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मात्र, नवनाथ बन (Navnath Ban) यांचा विजय सोपा करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा असा गैरवापर होतोय का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.  गृहमंत्री म्हणून राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मात्र, त्यांच्याच पक्षाकडून आणि पोलिसांकडून असे प्रकार घडत असतील, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे? असा संतप्त सवाल जन-सामन्याकडून विचारला जात आहे. आता यावर भाजप आणि देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही