Share

माझ्याबाबतीत अर्ध सत्य सांगितले जाते पण, मी लहानपणापासून पूजा करतो – शरद पवार

Sharad Pawar clarifies in Thane: “Since childhood, I have performed puja; half-truths are being spread about me.”

Published On: 

Sharad Pawar Says Half-Truths Spread About Him, Asserts Devotion Since Childhood

🕒 1 min read

ठाणे : “माझ्याबाबतीत अर्धसत्य सांगितले जाते. मी लहानपणापासून देवाची पूजा करतो,” असे स्पष्ट शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ठाण्यात बोलताना सांगितले. मुख्यमंत्री असताना पंढरपूरला तीन-चार वेळा जाऊन पांडुरंगाची पूजा केली, तसेच तुळजापूरमध्येही दर्शन घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

पाचपाखाडी भागातील गणेशवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उभारलेल्या तुळजाभवानी मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते बुधवारी पार पडली. या कार्यक्रमानंतर पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Sharad Pawar Says Half-Truths Spread About Him

पवार म्हणाले, “मी अशा कार्यक्रमांना जात नाही, असे जे अर्धसत्य पसरवले जाते, ते चुकीचे आहे. मी नेहमी देवपूजेमध्ये सहभागी राहिलो आहे,” असे पवार यांनी सांगितले. तुळजापुरच्या शक्तीपीठाच्या धर्तीवर ठाण्यात बांधलेल्या या मंदिराचे दरवाजे सर्व भक्तांसाठी खुले असल्याची घोषणा देखील पवार यांनी केली.

मंदिराची वैशिष्ट्ये:

या भव्य मंदिरात सुमारे दोन हजार टन काळ्या पाषाणाचा वापर करण्यात आला आहे. ३३ फूट उंचीचा कलश, नवग्रह, २६ भव्य स्तंभ, २० गजमुखांची रचना, तसेच १०८ दिव्यांची दीपमाळ याने हे मंदिर सजवले आहे. लोप पावत चाललेल्या हेमाडपंथी शैलीचा वापर करीत संपूर्ण मंदिर पाषाणातून उभारण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही