🕒 1 min read
Sanjay Raut | स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिप्पणी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीच्या नेत्यांनी कुणाल कामराविरोधात (Kunal Kamra) टीकेची झोड उठवली आहे. यानंतर कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी अनेकदा समन्स बजावले. मात्र अद्याप कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहिलेला नाही. कुणालविरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊतांना कुणाल कामराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने खुन केला आहे का?, असा सवाल संजय राऊतांनी केला.
Sanjay Raut Criticized State Government Over Kunal Kamra Controversy
“कुणाल कामराने खून केला आहे का? देशद्रोह केला आहे का? बँकॉकला फिरत आहेत का? ते नवाब शरीफचा केक कापायला गेलेत का? या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. माझं बोलणं झालं मी त्यांना सांगितलं आपण कायद्याचे रक्षक आहोत जरी गृह खात शेण खात असलं तरी आपल्याला कायदा पाहायला पाहिजे”, असे संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- “संगीता वानखेडेच्या मुली वाल्मिक कराडच्या कलाकेंद्रात…”; Karuna Munde यांचा मोठा दावा
- Tanisha Bhise यांच्या कुटुंबीयांचा हॉस्पिटलच्या अहवालावर आक्षेप; म्हणाले…
- Deenanath Mangeshkar महिला मृत्यू प्रकरणी धक्कादायक खुलासा! नातेवाईकांनी लपवून…













