Share

“घटस्फोट आता महागात पडेल”, Saif Ali Khan असं का म्हणाला?

Saif Ali Khan had to face a financial situation after the divorce. Saif had made a statement on this.

by MHD

Published On: 

Saif Ali Khan felt regret after statement on divorce

Saif Ali Khan । बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत असतो. सोशल मीडियावरही तो कायम सक्रिय असतो. अशातच आता या अभिनेत्याने घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केले आहे.

त्याच्या या वक्तव्याची आता चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. सैफ अली खानने खूप कमी वयात अभिनेत्री अमृता सिंग (Amrita Singh) हिच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांना सारा आणि इब्राहिम अशी दोन अपत्य झाली. पण या दोघांचं नातं जास्त काळ टिकलं नाही.

अखेर हे दोघे विभक्त झाले. सैफ याने अमृताला तब्बल 5 कोटी रुपयांचा पोटगी दिली असल्याची माहिती समोर आली. पण घटस्फोटानंतर सैफला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला होता. यावर सैफने एक वक्तव्य केलं होते.

“एक वेळ अशी येते, ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता तीच व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको असते. पण तुम्ही सतत घटस्फोट घेऊ शकत नाही. कारण यावेळी प्रचंड पैसा खर्च होत असतो,” असे सैफ म्हणाला.

Saif Ali Khan on Divorce

या वक्तव्यावर सैफ अली खान याला पश्चाताप होत आहे. “मी विचार करुन वक्तव्य करायला पाहिजे होते. तुम्ही ऋणी असले पाहिजे, कारण तुम्ही ज्या महिलेवर प्रेम करता, ती महिला तुमच्यासोबत पत्नी म्हणून आहे. ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता त्यावेळी तुम्ही व्यक्तीसाठी स्वतःच्या सवयी बदलता,” असे सैफ अली खान म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही