Share

पुण्यात धक्कादायक घटना | Ajit Pawar गटाच्या पदाधिकाऱ्याची स्वतःच्या आईला मारहाण

Ajit Pawar यांच्या गटातील पदाधिकारी आणि मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष मारुती देशमुख यांनी स्वतःच्या आईवर शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Published On: 

Dilip Mohite Patil says Ajit Pawar should become CM

PUNE NEWS | पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या गटातील पदाधिकारी आणि मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष मारुती देशमुख यांनी स्वतःच्या आईवर शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेत त्यांनी आई सावित्रीबाई देशमुख यांना घरातच मारहाण केल्याचा आरोप असून, त्यांच्या पाठीवर, हातावर आणि मानेवर जखमांचे वन दिसून येत आहेत.

सावित्रीबाई देशमुख काही महिन्यांपूर्वी मोठा मुलगा मारुती आणि विलास देशमुख यांच्या घरी राहायला आल्या होत्या. याआधी त्या पुण्यात लहान मुलगा राजेंद्र देशमुख याच्यासोबत राहत होत्या. काही दिवसांपूर्वी त्या मूळगावी देवघर येथे जाण्यासाठी आग्रह धरू लागल्या. मात्र, त्यांची ही इच्छा मारुती देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हती. त्यांना परत पुण्यातील लहान मुलाकडे पाठवण्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. अखेर, दोन दिवसांपूर्वी मारुती देशमुख यांनी आईला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती लहान मुलगा राजेंद्र देशमुख यांनी पोलिसांना दिली.

या प्रकरणी सावित्रीबाई देशमुख यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात मारुती देशमुख, त्यांच्या पत्नी आणि मुलाविरुद्ध तक्रार दिली. मात्र, हा गुन्हा अदखलपात्र स्वरूपाचा नोंदवला गेला आहे. या घटनेमुळे सत्ताधारी नेत्यांचे पदाधिकारी कायदा हातात घेत असल्याचा आरोप होत आहे.

अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, त्यांच्या पक्षातील कोणीही नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. तरीही, या प्रकरणात कठोर कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. स्वतःच्या आईला मारहाण करणाऱ्या मारुती देशमुख यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल का? त्यांना पक्षातून बडतर्फ केले जाईल का? पोलीस आणि प्रशासन यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही