Share

स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी Dhananjay munde यांना इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही

गोपीनाथ मुंडेंनी (Gopinath munde) मृत्यूपर्वी काही वर्षे अगोदर धनजंय मुंडेंना (Dhananjay munde) इशारा दिला, सांभाळू राहा पण ऐकलं नाही, अशी आठवण महाजन यांनी करुन दिली.

Published On: 

Dhananjay munde, Gopinath Munde, Namdev Shastri, Pankja Munde

सोलापूर : मंत्री धनजंय मुंडे ( Dhananjay Munde ) आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री ( Namdev Shastri ) यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर प्रकाश महाजन यांनी शास्त्री यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. महाजन म्हणाले, ”महिलांच्या बाबतीत वेगळा न्याय आणि पुरुषाच्या बाबतीत वेगळा न्याय का?. गडावर राजकारण होणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा तुम्ही घेतली होती, पण असं काय घडलं की भीष्मप्रतिज्ञा तुम्हाला तोडावी लागली.”

श्रीकृष्णाने देखील अत्यंत प्रिय व्यक्ती म्हणजे अर्जुनासाठी शस्त्र हाती घेतलं, असं काही आहे का की, तुमचा अत्यंत प्रिय कुणीतरी पडलाय आणि तुम्हाला शस्त्र हाती घ्यावा लागलं, असे म्हणत प्रकाश महाजन यांनी नामदेव शास्त्रींवर टीका केली आहे.

तसेच, गोपीनाथ मुंडेंनी (Gopinath munde) मृत्यूपर्वी काही वर्षे अगोदर धनजंय मुंडेंना (Dhananjay Munde) इशारा दिला, सांभाळू राहा पण ऐकलं नाही, अशी आठवण देखील महाजन यांनी करुन दिली.

पुढे बोलताना महाजन म्हणाले, ”मीडिया ट्रायल करून एखाद्याला एवढं लक्ष करणं हे मला पटत नाही. पण, या नैतिकेतून त्यांची सुटका नाही हेदेखील खरे आहे, जो भस्मासुर त्यांनी पोसला, त्या भस्मासुराने तुमच्या डोक्यावर आता हात ठेवला आहे. मरण्याच्या काही वर्षा अगोदर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी इशारा दिला होता, सांभाळून राहा पण ऐकलं नाही असे म्हणत प्रकाश महाजन यांनी धनंजय मुंडेंच्या आजच्या परिस्थितील ते स्वत:च कारणीभूत असल्याचे म्हटले.

नामदेव शास्त्री हे महंत आहेत, ज्ञानेश्वरीचे प्रचंड मोठे विद्वान आहेत. स्वतःच्या नावापुढे न्यायाचार्य लावतात, नामदेव शास्त्रींसारखे लोकं राजकारणात येतं असतील तर आम्हाला प्रचंड आनंद आहे. पण, 2015 ला पंकजासाठी बंद असलेल्या गडाचे दरवाजे 2025 मध्ये उघडले कसे? हा प्रश्न माझ्या मनात आहे. गडावर राजकारण करायचं नाही हे त्यांनी म्हटलेलं. राजकारणात आलाच आहात तर तुम्हाला फुलेही मिळतील काटेही मिळतील याची तयारी देखील त्यांना करावी लागेल, अशा परखड शब्दात प्रकाश महाजन (Prakash mahajan) यांनी नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे भेटीवर भाष्य केलं.

संत भगवान बाबांवर जेव्हा आरोप झाले, तेव्हा त्यांनी काय दिव्य केलं होतं हे तरी लक्षात घ्या, तेवढी हिंमत आहे का तुमची? या गोष्टीचं वाईट वाटतं की न्याय हा दुर्बलासाठी नसतो, नारीसाठी नसतो तर न्याय हा सबलासाठी असतो, पुरुषांसाठी असतो हे आजच्या या घटनेतून दिसतं, अशा शब्दात नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर प्रकाश महाजन यांनी परखड भाष्य केलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही