Share

जालन्याची निवडणूक महायुती, मविआकडून प्रतिष्ठेची, रावसाहेब दानवे पराभवाच्या छायेत

जालना : सलग पाच लोकसभा निवडणुकांत जालना मतदारसंघात भाजपचे कमळ फुलविणारे रावसाहेब दानवे यंदा षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात जरी उतरले असले तरी मविआचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी मित्रपक्षांचा ‘हात’ हाती घेत जोर लावला आहे. त्यामुळे आता ही लढत महायुती, मविआकडून प्रतिष्ठेची बनली असून, रावसाहेब दानवे पराभवाच्या छायेत असल्याच्या चर्चां जोर धरू लागल्या आहेत. जालन्याची … Read more

Published On: 

जालना : सलग पाच लोकसभा निवडणुकांत जालना मतदारसंघात भाजपचे कमळ फुलविणारे रावसाहेब दानवे यंदा षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात जरी उतरले असले तरी मविआचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी मित्रपक्षांचा ‘हात’ हाती घेत जोर लावला आहे. त्यामुळे आता ही लढत महायुती, मविआकडून प्रतिष्ठेची बनली असून, रावसाहेब दानवे पराभवाच्या छायेत असल्याच्या चर्चां जोर धरू लागल्या आहेत.

जालन्याची निवडणूक महायुती आणि मविआकडून प्रतिष्ठेची करण्यात आली असून, ‘वंचित’चे उमेदवार प्रभाकर बकले यांच्यासह अपक्ष उमेदवार प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढविणार आहेत.

जालन्यात चुरशीची लढाई, रावसाहेब दानवे षटकार मारणार?

जालना लोकसभा मतदारसंघात १९९९ ते २०१९ मध्ये झालेल्या पाचही निवडणुकांत भाजपचे रावसाहेब दानवे यांनी विजय मिळविला आहे. यामुळे महायुतीचे अर्थात भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात दानवे यांचा षटकार मारण्याचा इरादा आहे. यंदाच्या निवडणुकीत मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन, शेतमालाचे भाव, बेरोजगारी असे मुद्दे आहेत.

‘मविआ’च्या उमेदवारांनी याच मुद्द्याला प्रचारात हात घातला आहे. असे असले तरी दानवे यांच्याकडून केंद्र, राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या विकास कामांवर भर देत प्रचार केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही