Share

श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा खासदार करण्यासाठी सुनील शेळके यांनी कसली कंबर

Shrirang Barne तळेगाव दाभाडे | गेल्या 15 वर्षांत मावळ तालुक्यात म्हणावी अशी विकासकामे झाली नाहीत. 15 वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या साडेचार वर्षांत चार हजार कोटींचा निधी देऊन मावळातील विकासकामांची उणिव भरून काढली. अजित पवार यांना महायुतीत मानाचे स्थान दिले. त्यामुळे मावळ तालुक्यात माझ्यासह सर्व राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) नेते व … Read more

Published On: 

Shrirang Barne तळेगाव दाभाडे | गेल्या 15 वर्षांत मावळ तालुक्यात म्हणावी अशी विकासकामे झाली नाहीत. 15 वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या साडेचार वर्षांत चार हजार कोटींचा निधी देऊन मावळातील विकासकामांची उणिव भरून काढली. अजित पवार यांना महायुतीत मानाचे स्थान दिले. त्यामुळे मावळ तालुक्यात माझ्यासह सर्व राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) नेते व कार्यकर्ते महायुतीचा धर्म पाळत बारणे यांच्या प्रचारात हिरिरीने सहभागी झाले आहेत. ही निवडणूक ग्रामपंचाय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची नसून, देशाचा पंतप्रधान ठरवणारी आहे, असे स्पष्टीकरण आमदार सुनील शेळके यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा गेल्या निवडणुकीत बारणे यांनी पराभव केला होता. श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून, आपण पहिल्यापासून प्रचंड विरोध केला होता. मात्र आता बारणे यांच्या मताधिक्यासाठी आपण, आपले कार्यकर्ते झोकून काम करत आहोत. घरोघरी फिरतो आहोत, असेही आमदार शेळके यांनी स्पष्ट केले आहे.

याबद्दल विशेष माहिती देत असताना सुनील शेळके म्हणाले की, गेल्या दहा वर्षात बारणे यांनी विकासाची काय काम केली. हा लेखाजोखा जनतेला दिला पाहिजे. माझा विरोध बारणे यांना व्यक्तिगत नव्हता वैचारिक होता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बारणे यांनी दहा वर्षातील कामे जनतेसमोर मांडली. राज्यात महायुती असल्यामुळे महायुतीचा धर्म पाळून आम्ही निवडणुकीच्या कामाला जिद्दीने लागलो आहोत.

श्रीरंग बारणे यांना मावळच्या जनतेने दोन वेळा मताधिक्य देऊन दोन वेळा संसदेत पाठवले. त्यांनी नेमकी कोणती विकास कामे केली याचा लेखाजोखा त्यांनी मांडला पाहिजे. ही माझी अपेक्षा होती. उमेदवारी जाहिर झाल्यानंतर माझा कार्यअहवाल जनतेसमोर मांडेन, असे आप्पा बारणे यांनी सांगितले होते. आता उमेवदारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी तो अहवाल सादर केला आहे. कोणत्या गावांना किती निधी दिला. प्रलंबित कामांचाही तपशील त्यांनी दिला आहे. तो अहवाल त्यांनी तेव्हा सादर करावा, माझ्यासहित सर्वच मावळवासियांची तशी अपेक्षा होती.

माझा व्यक्तिगत स्वार्थ हा होता की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली तर अधिकचे सोयिस्कर होईल. 1952 पासून लोकसभेची स्थापना झाली तेव्हापासून या तालुक्याला खासदारकीचा मान मिळाला नाही. परंतु बारणे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर आम्हाला कुणाचेही आदेश न येताच त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली. आमचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते झोकून काम करत आहेत.

देश कुणाच्या हातात द्यायचा. देशाचे पंतप्रधान कुणाला करायचे यासाठी ही निवडणूक आहे. महायुतीचा धर्म पाळत असताना किंवा मावळ विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना येणाऱ्या अडचणी जर सोडवायच्या असतील तसेच तालुक्याती महत्वाकांक्षी प्रकल्प जर मार्गी लावायचे असतील तर केंद्र आणि राज्य सरकारची मदत घ्यावी लागते. शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आहेत. तेही मार्गी लावण्यासाठी केंद्राची मदत घ्यावी लागणार आहे. एकवीरा देवस्थान, ग्लास स्काय वॉक प्रकल्प, असे अनेक मोठमोठे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपल्या विचारांचा खासदार असायला हवा. म्हणून मावळात राष्ट्रवादीचा खासदार हवा होता. असे आम्हाला वाटत होते. मात्र आता बारणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांचा प्रचार आम्ही प्रभावीपणे सुरू केला आहे.

गेल्या 25 वर्षांचा बॅकलॉग अजितदादांनी भरून काढला. गेल्या चार वर्षात 2500 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आम्ही तालुक्यातील विविध प्रकल्प मार्गी लावू शकलो. गेल्या 25 वर्षात जी कामे झाली नाही ती कामे या 4 वर्षांत झाली आहेत. हे मावळवासियांना सर्व काही माहिती आहे.

महाराष्ट्राचे हित पाहून आमच्या नेत्याने जर भाजपाशी जुळवून घेण्याचे ठरविले असेल तर आम्ही का जुळवून घेऊ नये. तालुक्याच्या हितासाठी आम्ही महायुतीसोबत कायम राहू. ज्या वेळेला केंद्र सरकारशी निगडीत कोणते प्रश्न असतील. त्यावेळी सुनील शेळकेला ते प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या विचारांचा खासदार तिथे असायला हवा. माझ्या पक्षातील सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी एका ताकतीने एकजूट उभी आहेत. त्यांनीच महायुतीसोबत काम करण्याचे ठरविले आहे. काही लोकं कशावरही राजकारण करतात परंतु, आमच्या नेत्यांनी युती टिकविण्याचा निश्चय केला आहे. मावळ तालुक्याचे हित कशात आहे, हे पाहून तसेच सुनील शेळके यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देण्याचा निर्णय माझ्या राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे मताधिक्याने मावळ लोकसभेमध्ये श्रीरंग आप्पा बारणे यांचा विजय होईल. असाही विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला.

सर्वच घटक पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत. आणि आता आम्ही श्रीरंग बारणे यांचे काम करत आहोत. नाते गोत्याची, गावकी-भावकीची ही निवडणूक नाही. देशाचे पंतप्रधान ठरविण्याची ही निवडणूक आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा खासदार करण्यासाठी आमचे सर्वच कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही