Share

शेतकऱ्यांसाठी मोदी यांनी काय केले? महिलांना नरेंद्र मोदींनी फसवले – शरद पवार

🕒 1 min read  Sharad Pawar VS Narendra modi  : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर हल्ला करण्याचे काम मोदी सरकार करत असून नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नसताना ते मला प्रश्न विचारत आहेत, अशा शब्दांत शरद पवार यांनी मोदींवर टीका केली. देशातील जनताच त्यांची हुकूमशाही मोडून काढणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जळगाव येथे … Read more

Published On: 

🕒 1 min read

 Sharad Pawar VS Narendra modi  : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर हल्ला करण्याचे काम मोदी सरकार करत असून नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नसताना ते मला प्रश्न विचारत आहेत, अशा शब्दांत शरद पवार यांनी मोदींवर टीका केली. देशातील जनताच त्यांची हुकूमशाही मोडून काढणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जळगाव येथे मेळाव्यात बोलतांना पवार म्हणाले,” जळगाव जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत एकही नवीन उद्याोग आला नाही. खान्देशसह जिल्ह्यात वस्त्रोद्याोग उद्यान झाले नाही. केळी उत्पादकांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. केळीचे अनुदानही मिळाले नसल्याचे पवारांनी सांगितले.

तसेच उज्ज्वला गॅस योजनेतून महिलांची फसवणूक केली. गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. राहुल गांधी यांच्या पाठीशी देशातील युवक उभे राहत आहेत, असेही पवार यांनी म्हंटले आहे..

एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर का गेले, यावर पवार म्हणाले, ”एखाद्या व्यक्तीवर वैयक्तिक टीका करण्याची भूमिका महाराष्ट्रात यापूर्वी नव्हती. आता ती सुरू झाली आहे. त्यातून अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. ही परिस्थिती एकनाथ खडसेंवर आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून त्यांना काही निर्णय घ्यावा लागला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही