महायुतीच्या चारशे जागा आल्या तर संविधान बदलणार अशी अफवा – नितीन गडकरी

Nitin Gadkari : देशातील होऊ घातलेली लोकसभेची निवडणूक ही जनतेच्या भवितव्याशी संबंधित आहे. काँग्रेसच्या साठ वर्षांच्या काळात देशाचा विकास झाला नाही. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत करून दाखवला. आता विरोधकांकडे मुद्दा नसल्याने ते महायुतीच्या चारशे जागा आल्या तर संविधान बदलणार अशी अफवा पसरवत आहेत, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात आतापर्यंत तब्बल ८० वेळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना तोडण्याचे पाप काँग्रेसने केल्याचा आरोप रविवारी येथे केला.

यावेळी गडकरी म्हणाले की, काँग्रेसच्या काळात देशात ग्रामीण रस्ते व सिंचनासाठी प्राधान्य मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या काळात देशाचा विकास झाला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणली, तर नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षांत देशात सिंचन, रस्ते, शिक्षण यावर चांगले काम झाले आहे. पाणी हा कळीचा मुद्दा असून मागील दहा वर्षांत जलसंवर्धन, सिंचनाच्या कामांना प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने विविध योजना हाती घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. पाणी, रस्ते, दळणवळणाची व्यवस्था असेल तर उद्याोग येतील अन् बेरोजगारांना रोजगार मिळेल. त्यानुसार आमचे सरकार काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशात रस्ते, पाणी, रोजगार, शिक्षण व शेतीमालास भाव मिळाल्यास गावे स्मार्ट होतील. सरकारचे प्रयत्न असून आता चित्र बदलत असल्याचे सांगत त्यांनी येणाऱ्या काळात गावे समृद्ध होणार असल्याने गावांतून शहराकडे कामासाठी गेलेली शेतकऱ्यांची मुले परत गावी येतील, असा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांचे कल्याण करणारी नीती हेच आमचे धोरण असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.