Share

Chhagan Bhujbal। ‘दूरी तीरी एक्का छगन भुजबळ छक्xxx; भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मराठा समाजाची मागणी

Chhagan Bhujbal। Paithan मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या छगन भुजबळांविरोधात पैठण ( छत्रपती संभाजीनगर ) एमआयडीसीत रास्ता रोको करत निषेध आंदोलन. जालना जिल्ह्यातील अंबड येथे काल झालेल्या ओबीसी एल्गार मोर्चात मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) व इतर नेत्यांनी मराठा समाजाच्या विरोधात बेताल वक्तव्य करून खालच्या पातळीत टीका केली होती. त्यामुळे आज दि.१८ नोव्हेंबर … Read more

Published On: 

Chhagan Bhujbal। Paithan मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या छगन भुजबळांविरोधात पैठण ( छत्रपती संभाजीनगर ) एमआयडीसीत रास्ता रोको करत निषेध आंदोलन. जालना जिल्ह्यातील अंबड येथे काल झालेल्या ओबीसी एल्गार मोर्चात मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) व इतर नेत्यांनी मराठा समाजाच्या विरोधात बेताल वक्तव्य करून खालच्या पातळीत टीका केली होती.

त्यामुळे आज दि.१८ नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी ११ वा. पैठण एमआयडीसी जैन स्पिनर स्टॉप वर सकल मराठा समाजाच्या वतीने पैठण – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ), विजय वाडेट्टीवार, गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तिव्र शब्दात निषेध आंदोलन करण्यात आले.

संविधानिक पदावर मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या छगन भुजबळ यांचा राज्यपाल व मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ राजीनामा घ्यावा तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट जाहीर करावी अशी मागणी ही आंदोलकांनी यावेळी प्रशासनाकडे लावून धरली होती.

मागण्यांचे निवेदन महसूल व पोलीस प्रशासनाकडे देण्यात आले.याप्रसंगी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पैठण एमआयडीसी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही