🕒 1 min read
Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. दिवसेंदिवस मराठा समाजाचं आंदोलन तीव्र होत चाललं आहे.
काल राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात आज मराठा आरक्षणाबाबत फोनवर चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
Manoj Jarange and Eknath Shinde had a phone discussion about Maratha reservation
राज्यामध्ये सुरू असलेलं मराठा समाजाचं आंदोलन (Maratha Reservation) हिंसक वळण घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवर तब्बल 24 मिनिटे चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांना आपली तब्येत जपण्याचा सल्ला दिला आहे. तर मराठा समाजाला अर्धवट आरक्षण (Maratha Reservation) नको असं मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं आहे.
त्याचबरोबर या फोननंतर मनोज जरांगे यांनी आजपासून पाणी पिण्याची तयारी दर्शवली आहे. आतापर्यंत मनोज जरांगे यांना अनेक नेत्यांनी त्यांना फोन केला आहे.
जरांगे दरवेळी प्रत्येक नेत्याचा फोन लाऊडस्पीकरवर टाकून प्रसार माध्यमांना ऐकवत होते. परंतु, आज झालेला मुख्यमंत्र्यांचा फोन मनोज जरांगे यांनी लाऊडस्पीकरवर टाकलेला नाही.
त्यांनी त्यांचा आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा संवाद अद्याप उघड केलेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नक्की काय चर्चा झाली असेल? याबाबत आता तर्क वितर्क लावले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यात कुठं थंडीची चाहूल तर कुठं पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज
- Eknath Shinde – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा एकाकी; मराठा आरक्षणांवर फडणवीस-पवारांची दांडी
- Maratha Reservation | मराठ्यांचा संयम सुटला; मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी आमदाराच्या पेटवल्या गाड्या
- Maratha Reservation | शिंदे-फडणवीसांचा हलगर्जीपणा पडला सामान्य नागरिकांना महाग; आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द
- Maratha Reservation | मराठा समाजाची आक्रमक भूमिका अन् शिंदे-फडणवीस सरकारला आली जाग; मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











