Share

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांनी आधी ड्रग्सच्या रावणाला संपवावं अन् मग जय श्रीराम म्हणावं – संजय राऊत

🕒 1 min readSanjay Raut | मुंबई: राज्यामध्ये सध्या ड्रग्सचं प्रकरण चर्चेत आहे. अशात काल पैठण सारख्या छोट्या शहरामध्ये 250 कोटी रुपयांचं ड्रग सापडलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आधी ड्रग्सच्या रावणाला संपवावं आणि मग जय … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई: राज्यामध्ये सध्या ड्रग्सचं प्रकरण चर्चेत आहे. अशात काल पैठण सारख्या छोट्या शहरामध्ये 250 कोटी रुपयांचं ड्रग सापडलं आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आधी ड्रग्सच्या रावणाला संपवावं आणि मग जय श्रीराम म्हणावं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

A large amount of drug trade is going on in Pune, Mumbai – Sanjay Raut

आज (24 ऑक्टोबर) सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “सध्या श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांना कंठ फुटलेला आहे. हे मी अत्यंत जबाबदारीने बोलत आहे.

देवेंद्र फडणवीस हल्ली गरब्याला वगैरे फिरत असतात. एका गरबा समारंभामध्ये त्यांनी गर्जना केली की देश का बच्चा-बच्चा श्री राम बोलेगा. मात्र, देशातील बच्चा-बच्चा कधी श्रीराम बोलत नव्हता.

परंतु जे बच्चे-बच्चे जय श्रीराम म्हणत आहे, त्यांच्यापर्यंत ड्रग्स पोहोचवणाऱ्या रावणाचा बंदोबस्त करा. पंचवटी हे ठिकाण प्रभू श्रीरामाचं आहे ना? त्या पंचवटीमध्ये सर्वात जास्त ड्रग्सचा व्यापार सुरू आहे.

हे देवेंद्रजींना माहित आहे का? पैठण सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये 250 कोटींचं ड्रग्स सापडलं आहे. त्याचबरोबर पुणे, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यापार सुरू आहे.

एवढं सगळं असताना देवेंद्र फडणवीस म्हणतात बच्चा-बच्चा जय श्री राम बोलेगा. मात्र, ड्रग्स घेऊन ते जय श्रीराम म्हणणार नाही. त्यांनी आधी ड्रग्सच्या रावणाला संपवायला हवं आणि मग जय श्रीराम म्हणायला हवं.”

दरम्यान, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. दसरा हा मंगलमय सण, पण महाराष्ट्राचे अमंगल करणारे एक बेकायदेशीर, घटनाबाहय सरकार शिवरायांच्या महाराष्ट्रावर मोदी-शहांनी लादले आहे.

सत्तेचा माज व अहंकार अशाच पद्धतीने रावणाच्या नसानसांत उसळत होता. त्या अहंकाराचा नाश शेवटी दसऱ्याच्या दिवशी झाला. तेव्हापासून विजयादशमीचा उत्सव साजरा होत आहे.

घटनाबाहय, अहंकारी रावणाचा नाश होईल या जिद्दीने मराठी जनतेची मने व मनगटे तापली आहेत. शिवतीर्थावर ‘राम-लीला’ साजरी होईल. अहंकारी रावणाचे दहन होईल, महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल व भारत देश सूडाच्या फासातून मुक्त होईल.

महाराष्ट्राच्या जनतेने अहंकाराचा कोथळा काढण्यासाठी ‘राघनखे’ चढवली आहेत. आजच्या दसऱ्याचे हेच महत्त्व आहे. विजयादशमीच्या लाख लाख शुभेच्छा, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!