Share

Raj Thackeray | टोलच्या नावाखाली जमा होणारी रक्कम कुठे जमा होतेय? मनसे खडा सवाल

🕒 1 min readRaj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव गेले चार दिवस टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर 8 ऑक्टोबर म्हणजेच उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं होतं.Related News … Read more

Published On: 

🕒 1 min read

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव गेले चार दिवस टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते.

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर 8 ऑक्टोबर म्हणजेच उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं होतं.

राज्यातील सगळ्या टोलवर आम्ही चार चाकी आणि छोट्या गाड्यांना मुक्ती दिली आहे. राज्यातील टोलवर आम्ही फक्त कमर्शियल आणि मोठ्या गाड्यांचे टोल घेतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर मनसेने प्रतिक्रिया दिली आहे.

Toll companies are looting – MNS

“देवेंद्र फडणवीस काल म्हणाले की राज्यात दुचाकी, तीन चाकी आणि किंवा चारचाकी वाहनांना टोल माफ आहेत. मग आजपर्यंत टोलच्या नावाखाली जमा होणारी रक्कम कुठे जमा होत आहे?

एकतर राज्य सरकार खोटं बोलत आहेत किंवा टोल कंपन्या लूट करत आहेत. मी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आणि त्यांना सांगणार आहे की देवेंद्र फडणवीस म्हणालेत तसं दुचाकी तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना टोल माफ करा, आणि इतके दिवस जे पैसे गोळा झालेत तर ते कुठे गेले?

आणि इतकं होऊन पण जर टोल वसूल केला जाणार असेल तर माझे महाराष्ट्र सैनिक टोल नाक्यांवर उभे राहून वाहनांना सोडायला लावेल. आणि तरीही जर संघर्ष झाला तर आम्ही टोलनाके जाळून टाकू. मग जे होईल ते होईल”, असं मनसेनं (Raj Thackeray) ट्विट करत म्हटलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे. “म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ??

मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून” असं तेजस्विनी पंडित हिने ट्विट करत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!