Share

Ajit Pawar | अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात का गेलो नाही? अजित पवार म्हणतात…

Ajit Pawar | पुणे: शनिवारी (23 सप्टेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांच्यासोबत उपस्थित होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली नाही. अजित पवार अमित शाह यांना न भेटल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात … Read more

Published On: 

Ajit Pawar | पुणे: शनिवारी (23 सप्टेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांच्यासोबत उपस्थित होते.

मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली नाही. अजित पवार अमित शाह यांना न भेटल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे.

My program was scheduled for September 23 – Ajit Pawar 

पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “आधीपासूनच माझे 23, 24 आणि 25 सप्टेंबरचे दौरे ठरलेले होते. गणपतींचं दर्शन घेण्यासाठी अमित शाह मुंबईत आले होते. त्यांच्या या दौऱ्याची मला माहिती मिळाली होती.

त्यानंतर मी अमित शाह यांच्या ऑफिसला फोन केला. माझा 23 सप्टेंबरचा प्रोग्राम ठरलेला आहे, असं मी त्यांना सांगितलं. मी गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईत येत आहे, असं त्यांनी मला सांगितलं.

त्यामुळे तुम्ही तुमचे ठरलेले कार्यक्रम करा, तुम्ही माझ्या भेटीला नाही आलात तरी चालेल, असा त्यांनी मला निरोप दिला. त्याच्यामुळे मी अमित शाह यांची भेट न घेता माझा ठरलेला कार्यक्रम केला.”

दरम्यान, अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान सहकार या विषयावर व्याख्यान केलं आहे. या व्याख्यानावरून ठाकरे गटानं अमित शाह आणि भाजप सरकारला धारेवर धरलं आहे.

जे भाजपच्या गोटात जात नाहीत त्यांच्या सहकारी संस्था, बँका, कारखान्यांच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा लावून जेरीस आणायचे, त्या संस्था मोडीत काढायच्या व आपापल्या लोकांना त्या ताब्यात घ्यायला लावायचे असे हे ‘सहकारी’ चळवळीचे नवे मार्ग भाजप राजवटीत निर्माण झाले.

राजकारणाने सहकारी चळवळीचा घात केला तो असा. पक्ष फोडण्यासाठी व सरकारे खाली खेचण्यासाठी सहकारी चळवळीचा गैरवापर झाला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या व्याख्यानातून हा मुद्दा तेवढा निसटला! व्याख्यान द्यायला आले, पण व्याख्यानाचे शेवटी आख्यान झाले. व्याख्यान सत्यावर आधारित असते. आख्यानात कपोलकल्पित गोष्टीचा भर असतो, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही