Share

Eknath Shinde | आम्ही फक्त घोषणा नाही तर अंमलबजावणी देखील करतो – एकनाथ शिंदे

🕒 1 min readEknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.Related News for Youजयंत पाटलांनी फडणवीसांना सांगितला मास्टरप्लॅन… एका … Read more

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.

यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. आम्ही फक्त घोषणा करत नाही तर अंमलबजावणी देखील करतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Our government implements things after the announcement – Eknath Shinde

पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “आम्ही फक्त घोषणा करून कागदावर ठेवत नाही. तर आमचं सरकार घोषणा झाल्यावर अंमलबजावणी देखील करतं.

मराठवाड्यातील लोकांना न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आम्ही काही निर्णय घेतले आहे. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये जे प्रकल्प रखडलेले होते त्यांना आम्ही मार्गी लावत आहोत.

औद्योगिक इंडस्ट्री दिवसेंदिवस वाढत आहे आणि याचा मराठवाड्याला नक्की फायदा होणार आहे. मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 14 हजार कोटींच्या नदीजोड प्रकल्पाचा देखील समावेश आहे.”

पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, “मराठवाड्याबद्दल ठोस निर्णय घेण्यासाठी आणि मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आमची ही आजची बैठक पार पडली आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अनेकांनी काम करतो, अशा घोषणा केल्या आहेत. तर त्यानंतर आमच्या मंत्रिमंडळाने सामान्य लोकांना डोळ्यासमोर सर्व निर्णय घेतले आहेत.

जेव्हा इंडिया आघाडीचे लोक आले होते, तेव्हा ते पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. तर या बैठकीदरम्यान आम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये न थांबता शासकीय विश्रामगृहात थांबलो होतो. त्यामुळे पुढच्या वेळी विरोधकांनी थोडा अभ्यास करून बोलायला हवं.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!