Share

Sanjay Raut | “… म्हणून सरकारला जरांगेंचं उपोषण गुंडाळायचं”; संजय राऊतांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

🕒 1 min readSanjay Raut | मुंबई: मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगला तापला आहे. जालना जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले होते. मात्र, सरकारचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई: मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगला तापला आहे. जालना जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे.

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले होते. मात्र, सरकारचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती केली पाहिजे, एवढचं आमचं म्हणणं आहे.

मराठा समाजाचा एक तरुण नेता मराठा आरक्षणासाठी आपला जीव पणाला लावत आहे. सरकार फक्त चर्चा, बैठका, समित्या उपसमित्या यामध्ये गुंतलं आहे. कालच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये काय झालं? याच्याशी बाहेर कोणाला काही घेणं देणं नाही. तुम्ही अंमलबजावणी काय करता?

Eknath Shinde is holding his meeting in Marathwada

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “16 की 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्यामध्ये कॅबिनेट बैठक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाड्यात आपली बैठक घेत आहे. त्या बैठकीच्या आधी त्यांना जरांगे यांचं उपोषण गुंडाळायचं आहे.

त्यासाठी सरकार खोटी आश्वासन देत आहे. त्यांच्या मराठवाड्यातल्या कॅबिनेट बैठकीला अपशकुन नको, लोकांनी रस्त्यावर उतरून बंद पुकारू नये, लोकांनी त्यांच्या गाड्या फोडू नये यासाठी त्यांना जरांगे यांचं उपोषण गुंडाळायचं आहे.

त्या तरुण नेत्यांचे प्राण महत्त्वाचे आहे, असं मला वाटतं. त्याच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी तो तरुण नेता महत्त्वाचा आहे. त्यामुळं यावर एखादा तोडगा समोर आला पाहिजे. उपोषण मागे घ्या, हे आम्ही त्यांना कोणत्या तोंडाने सांगणार आहोत.”

“मनोज जरांगे यांना मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मला कळालं होतं की ते त्यांचं उपोषण मागे घेणार नाही. कारण त्यांना काही मिळवायचं नाहीये.

त्याचबरोबर मनोज जरांगे हे नेते नाही. त्यांना लोकांनी नेता बनवलं आहे. त्यामुळे काही ठोस कागदपत्र मिळाल्याशिवाय ते मागे हटणार नाही. कारण त्यांचा स्वभाव मी पाहिला आहे”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!