Share

Ajit Pawar | लाठी हल्ल्याचे वरून आदेश आल्याचं विरोधकांनी सिद्ध करून दाखवावं – अजित पवार

Ajit Pawar | मुंबई: जालना जिल्ह्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू असताना पोलीसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. वरून आदेश आल्यानंतर पोलिसांनी हा लाठीचार्ज केला असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. विरोधकांच्या या आरोपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाठी हल्ल्याचे वरून आदेश आल्याचं विरोधकांनी सिद्ध करून दाखवावं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. Many communities … Read more

Published On: 

Ajit Pawar | मुंबई: जालना जिल्ह्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू असताना पोलीसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. वरून आदेश आल्यानंतर पोलिसांनी हा लाठीचार्ज केला असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

विरोधकांच्या या आरोपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाठी हल्ल्याचे वरून आदेश आल्याचं विरोधकांनी सिद्ध करून दाखवावं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Many communities are demanding for reservation – Ajit Pawar

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “आजारी असल्यामुळे मी बाहेर पडलो नव्हतो. मात्र, त्याबाबत देखील गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा सर्वांनी स्पष्ट शब्दात विरोध दर्शवला आहे.

जालन्यात जे घडलं ते घडायला नको होतं, अशी भूमिका सर्वांनी स्पष्ट केली आहे. अशा प्रकारचे प्रसंग जेव्हा येतात, तेव्हा राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी आपली भूमिका मांडली हवी.

मात्र, काही लोक या घटनेच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक समाज आरक्षणासाठी मागणी करत असतात. मात्र, त्यांची ती मागणी कायद्याच्या चौकटीत बसायला हवी.

त्यांची ती मागणी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात मान्य व्हायला हवी. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना त्यांनी उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवलं होतं.

मात्र, त्यावेळी ते सुप्रीम कोर्टात नाकारण्यात आलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदे देखील आपल्या परीनं यासाठी प्रयत्न करत आहे.”

पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “सध्या राज्यामध्ये काही ठिकाणी बंद सुरू आहे, एसटी बसची जाळपोळ सुरू आहे. मात्र यामध्ये आपल्या राज्याचं नुकसान होत आहे.

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत अनेक प्रकारचे आंदोलन झाले आहे. त्या आंदोलनांचं देश पातळीवर कौतुक झालेलं आहे. कारण अत्यंत शांततेत ही आंदोलनं झाली आहे.

काहींना मुद्दाम बदनाम करण्याचं प्रयत्न सुरू आहे. वरून आदेश आले, असं विरोधक म्हणत आहे. वरून आदेश आले होते. हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं. त्यांनी जर हे सिद्ध केलं तर ते म्हणतील आम्ही ते ऐकू. मात्र काही नसताना उगाच गैरसमज पसरवण्याचं काम केलं जात आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही