Share

Sanjay Raut | “भाजपनं मतदानासाठी माणसं विकत घेतली..”; संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

🕒 1 min readSanjay Raut | नवी दिल्ली: राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडत असतात. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे. मतदानासाठी भाजपनं लोकं विकत घेतली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.Related News for Youराष्ट्रवादीत खडाजंगी, … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | नवी दिल्ली: राज्याच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडत असतात. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे. मतदानासाठी भाजपनं लोकं विकत घेतली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

BJP must have bought people to vote – Sanjay Raut

आज सकाळी प्रसार माध्यमांची संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “सध्या सुरू असलेल्या लढाईमध्ये प्रत्येक योद्धा हजर आहे.

भाजपनं  मतदानासाठी माणसं विकत घेतली असतील . मात्र, आमच्यावर अजून ती वेळ आलेली नाही. कारण आमचा प्रत्येक योद्धा ही लढाई लढण्यास सक्षम आहे.

आमच्यात भीष्मपितांपासून अभिमन्यूपर्यंत सर्व लढले आहेत. त्यांनी आमच्या संजय सिंगचा अभिमन्यू केला, तरी आम्ही लढत राहिलो.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “ज्या ठिकाणी आपलं सरकार नाही. तिथे ते राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मात्र, महाराष्ट्रात राज्यपाल कुठे आहे? महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्यात राज्यपालाच अस्तित्व होतं. राज्यामध्ये सध्या खूप गुन्हे घडत आहेत. त्याचबरोबर खून, हत्या, महिला अत्याचाराचे प्रकरण वाढत आहे. तर मग आता राज्यपाल कुठं आहे?”

यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते (Sanjay Raut) म्हणाले, “राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाऊ आहेत.

म्हणून दोन्ही भाऊ कधीही भेटू शकतात, हे मी आधी देखील सांगितलं आहे. त्यांच्या भेटीमध्ये तिसऱ्या माणसाला पडण्याची गरज नाही. माझं दोघांसोबतही जिव्हाळ्याचं नातं आहे. त्याचबरोबर मी दोघांनाही चांगल्या प्रकारे ओळखतो.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!