Share

Rohit Pawar | काका-पुतण्याच्या भेटीत काय चर्चा झाली? रोहित पवारांनी स्पष्ट सांगितलं

Rohit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या दालनामध्ये काका-पुतण्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आमदार रोहित पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांच्या भेटीत नेमकं … Read more

Published On: 

Rohit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली.

विधिमंडळाच्या दालनामध्ये काका-पुतण्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आमदार रोहित पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? याबद्दल आमदार रोहित पवार यांनी माहिती दिली आहे.

I went to Ajit Pawar with three or four subjects – Rohit Pawar

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “मी अजित पवारांकडे तीन-चार विषय घेऊन गेलो होतो. त्या विषयांवर आम्ही चर्चा केली. महाराष्ट्रामध्ये सरकारी परीक्षांसाठी 900 ते 1000 रुपये फी घेतली जाते.

राज्यामध्ये राजस्थान पॅटर्ननुसार 600 रुपये फी घ्यावी या संदर्भात मी त्यांना पत्र दिलं आहे. अजित पवार महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री असताना त्यांनी एमपीएससी सदस्य वाढवण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. याबाबत या बैठकीत आम्ही चर्चा केली आहे.”

पुढे बोलताना ते (Rohit Pawar) म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील विमा योजनेसाठी वेळ वाढवून द्या, असं मी त्यांना सांगितलं आहे.

त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील एमआयडीसी विषयाचा निकाल लवकरात लवकर लावावा, असही मी त्यांना सांगितलं आहे. सरकारी नोकरीमध्ये काही भरत्या राहिलेल्या आहेत त्या लवकरात लवकर करा, हे देखील मी त्यांना म्हटलं आहे.”

दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी फुटी नंतर रोहित पवारांनी (Rohit Pawar) शरद पवार यांना पाठिंबा दिल्याचं दिसून आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर आज रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट झाली आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही