Share

Nitesh Rane | उद्यापासून प्रसारित होणारी उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे हास्यजत्रेचा महाएपिसोड – नितेश राणे

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतली आहे. ठाकरे गटाकडून या मुलाखतीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर या प्रोमोवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश … Read more

Published On: 

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतली आहे. ठाकरे गटाकडून या मुलाखतीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

या प्रोमोनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर या प्रोमोवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

माध्यमांशी संवाद साधत असताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांची उद्यापासून प्रसारित होणारी मुलाखत म्हणजे हास्य जत्रेचा महाएपिसोड असणार आहे.

या मुलाखतीच्या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख असा उल्लेख करण्यात आलेला आहे. कुटुंब प्रमुख या शब्दावर माझा आक्षेप आहे. कारण महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. आम्ही शिवाजी महाराजांना आमचा कुटुंब प्रमुख मानतो.

The biggest corrupt person is sitting in Matoshree – Nitesh Rane

पुढे बोलताना ते (Nitesh Rane) म्हणाले, “उद्धव ठाकरेंना जेव्हा जबाबदारी मिळाली होती त्यांनी गळ्याला पट्टा बांधून फक्त स्वतःच्याच कुटुंबाला सांभाळलं आहे.

तेव्हा त्यांनी महाराष्ट्राला कुटुंबाप्रमाणं सांभाळलं नाही. अण्णा हजारेंनी मातोश्री बाहेर आंदोलन करण्याची गरज आहे. कारण सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी मातोश्रीमध्ये बसला आहे.”

“26 जुलैला जेव्हा महापूर आला होता, तेव्हा बाळासाहेबांना एकटं टाकून उद्धव ठाकरे फॅमिलीसोबत ताजमध्ये जाऊन राहत होते.

त्याचबरोबर बाबरी पडली तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीच्या एका खोलीतील कॅमेरे साफ करत होते. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारावर मोठा कलंक आहे”, असही ते यावेळी (Nitesh Rane) म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही