Share

Sanjay Raut | केंद्र सरकारनं पाकिस्तानला दम देण्यापेक्षा चीनला दम घ्यावा – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. पंतप्रधान मोदींनी पेटलेल्या मणिपूरला शांत करणं गरजेचं आहे. मणिपूरमध्ये लिबिया सिरियासारखी परिस्थिती निर्माण झाली  असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. China is involved in the violence in Manipur – Sanjay Raut संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मिळालेल्या … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. पंतप्रधान मोदींनी पेटलेल्या मणिपूरला शांत करणं गरजेचं आहे. मणिपूरमध्ये लिबिया सिरियासारखी परिस्थिती निर्माण झाली  असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

China is involved in the violence in Manipur – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मिळालेल्या माहितीनुसार मणिपूर अस्थिर करण्यामागे आणि मणिपूरच्या हिंसाचारामध्ये चीनचा हात आहे, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. मात्र, देशाचे संरक्षण मंत्री जम्मूला जातात आणि पाकिस्तानला दम देतात. पाकिस्तानात घुसण्याची धमकी देतात. पण सध्या त्या ठिकाणी शांतता आहे.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री तिकडे कशात काही नसताना पाकिस्तानला दम देत आहे. पण त्यांना मणिपूरला जाऊन चीनला डोळे वटारून दाखवण्याची गरज आहे. कारण मणिपूरमध्ये चीनचा हस्तक्षेप आहे. प्रश्न चीनचा आहे आणि सरकार दम पाकिस्तानला देत आहे.”

“राहुल गांधी (Rahul Gandhi) जर मणिपूरला जात असतील, तेथील जनतेशी संवाद साधून काही मार्ग काढणार असतील, तर राहुल गांधी यांच्या मणिपूर भेटीचं आम्ही स्वागत करू”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install