Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन रद्द करण्याची मागणी ईडीनं न्यायालयाकडं केली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना ईडीमार्फत ब्लॅकमेल केलं जात असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut is not afraid of all these inquiries – Ambadas Danve
अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “संजय राऊत या सर्व चौकशीला घाबरत नाही. त्याचबरोबर येणाऱ्या काळात ते कधी घाबरणार नाही. कारण या सर्व गोष्टी राजकीय हेतूनं सुरू आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा जामीन रद्द होऊ शकत नाही. राजकीय दबाव आणि राजकीय ब्लॅकमेलिंग ईडीमार्फत सुरू आहे.”
पुढे बोलताना ते (Ambadas Danve) म्हणाले, “मुंबईच्या न्यायालयानं ज्या पद्धतीनं संजय राऊत यांचा जामीन मंजूर केला होता, केला आहे त्यात सुस्पष्टपणे संजय राऊत साहेबांवर कोणतेही आरोप सिद्ध होत नाही. म्हणून मला वाटतं त्यांना अडकवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आता जामीन रद्द होऊ शकणार नाही.”
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या पंढरपूर दौऱ्यावर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे म्हणाले, “पंढरपूरला पोहोचण्याआधी केसीआर यांनी 100 बोकडे आणि 500 कोंबड्या असा जेवणाचा बेत आखला होता. बोकडे आणि कोंबड्या कापून खाऊन ते पंढरपूरला दर्शनाला गेले होते. केसीआर यांनी खोटी भक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Ambadas Danve | “केसीआर मटण खाऊन पंढरीला गेले अन्…”; अंबादास दानवेंची केसीआरवर खोचक टीका
- Uday Samant | ठाकरे गटाकडून माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
- Sudhir Mungantiwar | “शिंदे-फडणवीसांमध्ये काही वाद नाही, मात्र काही शकुनी…”; सुधीर मुनगंटीवार यांचा खोचक टोला
- Chitra Wagh | ही आहे राष्ट्रवादी काँग्रेसची असली नियत, थेट माऊली विठ्ठलाच्या चेहऱ्यावरच बोकड – चित्रा वाघ
- Ramdas Athawale | प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देणं आम्हाला आवडलेलं नाही – रामदास आठवले