Ramdas Athawale | प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देणं आम्हाला आवडलेलं नाही – रामदास आठवले

Ramdas Athawale | अहमदनगर: काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली होती. या प्रकरणावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांची चळवळ मुस्लिमांना पाठिंबा देणारी आहे. मात्र, औरंगजेबाला पाठिंबा देणारी नाही, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. मात्र, ते आमच्या दलित समाजाला अजिबात आवडलेलं नाही. मुस्लिम समाजातील तरुणांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून हिंदू समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. त्यामुळं त्यांनी काहीतरी मुद्दा काढून आमच्यासोबत वाद घालू नये.”

All Muslims living in India were formerly Hindus – Ramdas Athawale

पुढे बोलताना ते (Ramdas Athawale) म्हणाले, “भारतामध्ये राहणारे सर्व मुस्लिम पूर्वी हिंदू होते. त्या आधी ते सर्व हिंदू बौद्ध होते आणि सर्व बौद्ध आधी वैदिक होते. त्यामुळं हिंदू आणि मुस्लिम यांनी एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं आहे.”

“काँग्रेस आणि विरोधी पक्षवाले सर्व मुस्लिम समाजाला भडकवत आहे. मुस्लिम समाजांनं त्यांचं ऐकू नये. राज्यात आणि इतर ठिकाणी दंगली होऊ नये. त्याचबरोबर या मुद्द्यावरून कोणी वाद निर्माण करू नये”, असं असही ते (Ramdas Athawale) म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.