Raj Thackeray | महाराष्ट्र सैनिकांनो डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा; राज ठाकरेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: काल (27 जुन) पुणे शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. सदाशिव पेठेत एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून एका तरुणांनं कोयत्यानं हल्ला केला. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होताना दिसले. याच घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

An unfortunate incident of attack on a young woman took place in Pune yesterday

ट्विट करत राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं.”

“दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा”, असही ते (Raj Thackeray) या ट्विटमध्ये म्हणाले आहे.

दरम्यान, शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात काल हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर पुणे शहरात खळबळ (Raj Thackeray) उडाली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.