Share

KL Rahul | टीम इंडियाच्या चिंतेत भर! आयपीएल नंतर केएल राहुल WTC मधून बाहेर?

🕒 1 min readKL Rahul | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये भारतीय खेळाडूंची दुखापत हा चिंतेचा विषय ठरत आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना गंभीर जखमा झाल्या आहेत. पुढच्या महिन्यामध्ये भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळायचा आहे. अशात लखनौ सुपर जायंट्स … Read more

Published On: 

🕒 1 min read

KL Rahul | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये भारतीय खेळाडूंची दुखापत हा चिंतेचा विषय ठरत आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना गंभीर जखमा झाल्या आहेत. पुढच्या महिन्यामध्ये भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळायचा आहे. अशात लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल आयपीएल सोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधूनही बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या सामन्यादरम्यान गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधूनही बाहेर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केएल राहुलच्या या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या चिंतेत भर पडली आहे. पुढच्या महिन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्याआधी केएल राहुल बरा झाला नाही, तर त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला मुकावे लागू शकते.

दरम्यान, पुढच्या महिन्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर झालेला असून, केएल राहुल देखील टीमचा भाग आहे. अशात राहुलच्या दुखापतीमुळे BCCI च्या चिंतेत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!