Raj Thackeray | महिला दिनानिमित्त राज ठाकरेंची ‘ती’ फेसबुक पोस्ट चर्चेत

Raj Thackeray | मुंबई : गेली अनेक वर्षांपासून स्त्रियांना देशात दुय्यम स्थान दिलं जातं. भारत देश हा पुरुषप्रधान संस्कृतीचा देश असल्याचे देखील अभ्यासात सांगितलं जातं. काळाप्रमाणे बदल हा गरजेचा असतो. आधुनिक काळात आधुनिक विचारांची बीजे रोवण्यासाठी स्त्रियांचे हक्क, महिला सबलीकरण, महिलांची प्रगती, महिलांचा विकास, ग्रामीण भागातील महिला, शहरी भागातील महिला यांच्या जाणीवा उणिवांबाबत आजच्या महिला … Read more

Published On: 

Raj Thackeray | मुंबई : गेली अनेक वर्षांपासून स्त्रियांना देशात दुय्यम स्थान दिलं जातं. भारत देश हा पुरुषप्रधान संस्कृतीचा देश असल्याचे देखील अभ्यासात सांगितलं जातं. काळाप्रमाणे बदल हा गरजेचा असतो. आधुनिक काळात आधुनिक विचारांची बीजे रोवण्यासाठी स्त्रियांचे हक्क, महिला सबलीकरण, महिलांची प्रगती, महिलांचा विकास, ग्रामीण भागातील महिला, शहरी भागातील महिला यांच्या जाणीवा उणिवांबाबत आजच्या महिला दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

राज ठाकरेंची फेसबुक (Raj Thackeray’s Facebook Post)

“आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची, स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. आणि त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशात नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत, आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे”, असं राज ठाकरे फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

“राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत”

“१००,१५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे.”

“Women should enter politics”

“स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे, आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे.” असे राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टमध्ये शेवटी लिहिलं आहे

महत्वाच्या बातम्या-

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही