Share

Shubhangi Patil | “कुणीही मुद्दामून नॉट रीचेबल होत नाही, वेळ आल्यावर…”; शुभांगी पाटील नेमकं काय म्हणाल्या?

🕒 1 min read Shubhangi Patil | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत रोज नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील सकाळपासून नॉट रिचेबल होत्या. नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला नाही त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. ही सगळी देवेंद्र फडणवीस यांची खेळी आहे अशी चर्चा सुरू झाली. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Shubhangi Patil | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत रोज नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील सकाळपासून नॉट रिचेबल होत्या. नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला नाही त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. ही सगळी देवेंद्र फडणवीस यांची खेळी आहे अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान, शुभांगी पाटील यांनी आता समोर येत नॉट रिचेबल असण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.

“राजकारणात सहन करण हे, ते सगळं चालत असत, शेवटी राजकारणात काय वेळ येईल हे सांगता येत नाही. काहीतरी असल्याशिवाय कुणी नॉट रीचेबल होणार नाही, नॉट रीचेबल का झाले हे वेळ आल्यावर सांगेल”, असं शुभांगी पाटील (Shubhangi Patil) म्हणाल्यात.

त्या म्हणाल्या, “उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित दादा, जयंत पाटील या सगळ्याशी संवाद साधला असून या पक्ष श्रेष्ठींना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. भाजपाने थोडासा वेगळा विचार केला असेल, म्हणून त्यांनी ती संधी दिली नाही. भाजपमध्ये अवघ्या तीन महिन्यापूर्वी गेली होती. ”

“भाजपने शब्द दिला म्हणूनच, भाजपात प्रवेश केला होता. तुम्ही पक्षात या आम्ही विचार करू असं सांगितलेले होते. मात्र ऐनवेळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. पण महाविकास आघाडी संधी देईल, अशी आशा शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी व्यक्त केली.

“मी एक महिला शिक्षक उमेदवार असून गेल्या दहा वर्षापासून शिक्षकांचे अनेक प्रश्न, विनावेतन, पेन्शन, पदभरती असेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, अनेक हजारो प्रश्न सोडून सोडवले आहे, त्यामुळे सगळ्या शिक्षक संघटना पाठिंबा देतील, असं शुभांगी पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही