Almond oil and vitamin E capsules | बदाम तेल आणि विटामिन ई कॅप्सुलच्या मदतीने केसांच्या ‘या’ समस्या होतील दूर

Almond oil and vitamin E capsules | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्रत्येकाला सुंदर, निरोगी आणि चमकदार केस (Shiny hair) हवे असतात. मात्र, अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याचे सवयीमुळे केसांना पुरेसे पोषण मिळत नसल्यामुळे केसांना समस्यांना (Hair problems) सामोरे जावे लागते. केसांच्या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक पार्लरमध्ये जाऊन हेअर ट्रीटमेंट घेतात. मात्र, या ट्रीटमेंट केसांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही बदाम तेल आणि विटामिन ई कॅप्सुलचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला दोन विटामिन ई कॅप्सुलमध्ये सुमारे दहा ग्राम बदाम तेल मिसळून घ्यावे लागेल. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हे तेल हलक्या हाताने केसांना लावावे लागेल. आठवड्यातून तीन वेळा बदाम तेल आणि विटामिन ई कॅप्सुलचा वापर केल्याने केसांच्या खालील समस्या दूर होऊ शकतात.

केस मजबूत होतात (Hair becomes stronger-Almond oil and vitamin E capsules)

बदाम तेलामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते, जे केस मजबूत बनवण्यास मदत करते. त्याचबरोबर केस गळतीच्या समस्यावर मात करण्यासाठी बदाम तेल आणि विटामिन ई कॅप्सुल उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे तुम्ही जर केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर तुम्ही बदाम तेल आणि विटामिन ई कॅप्सुलचा वापर करू शकतात.

केसातील कोंडा दूर होतो (Removes dandruff-Almond oil and vitamin E capsules)

तुम्ही जर केसातील कोंड्याच्या समसस्येपासून त्रस्त असाल, तर तुम्ही विटामिन ई कॅप्सुल आणि बदाम तेलाचा वापर करू शकतात. या तेलाने नियमित मसाज केल्याने केसातील कोंड्याची समस्या दूर होऊ शकते. विटामिन ई कॅप्सुल आणि बदाम तेलाचे मिश्रण केसांमध्ये साचलेली घाण दूर करण्यास मदत करते.

केसांच्या वाढीस चालना मिळते (Promotes hair growth-Almond oil and vitamin E capsules)

बदाम तेल आणि विटामिन ई कॅप्सुलमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे टाळूचे रक्त परिसंचन सुधारण्यास मदत करतात. रक्तभिसरण चांगले झाल्यामुळे ऑक्सिजन केसांच्या टाळूपर्यंत पोहोचते आणि केसांच्या वाढीस चालना मिळते. त्यामुळे तुम्ही जर केस वाढवण्यासाठी उपाय शोधत असाल, तर विटामिन ई कॅप्सुल आणि बदाम तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

बदाम तेल आणि विटामिन ई कॅप्सुलच्या मदतीने केसांच्या वरील समस्या दूर होऊ शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये त्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकतात.

मॉइश्चरायझर (Moisturizer-Oliy Skin)

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी त्वचेला मॉइश्चरायझ करणे खूप गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी ऑइल फ्री मॉइश्चरायझर किंवा जेलचा वापर करा. त्वचेला नियमित मॉइश्चरायझ केल्याने त्वचेला आतून पोषण मिळते आणि त्वचा निरोगी राहते.

सनस्क्रीन (Sunscreen-Oliy Skin)

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन लावणे खूप महत्त्वाचे आहे. सनस्क्रीन वापरल्याने त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून सुरक्षित राहते. उन्हाळ्यामध्ये नियमित सनस्क्रीन वापरल्याने त्वचा फ्री रॅडिकल्सपासून सुरक्षित राहते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या