Weather Update | विदर्भात पावसाची शक्यता, तर उर्वरित राज्यात वाढला उन्हाचा तडाखा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यामध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. तर आता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यात उन्हाच्या झळा (Heat) पुन्हा वाढल्या आहेत. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. तर किमान तापमानातही मोठी वाढ झाल्याचे दिसले आहे. आज (29 मार्च) राज्यामध्ये उन्हाचा चटका कायम राहणार आहे.

विदर्भात पावसाची शक्यता (Chance of rain in Vidarbha)

उद्यापासून (30 मार्च) विदर्भातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे, आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा इत्यादी रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.

राज्यामध्ये कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार (Weather Update) होताना दिसत आहे. सोलापूर, अकोला, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 37 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. तर उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा  33 ते 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने (Weather Update) हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button