Share

Job Opportunity | एअर इंडिया एअर सर्विसेस (AIASL) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL), नागपूर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. एअर इंडिया एअर सर्विस लिमिटेड नागपूर यांच्यामार्फत सुरू … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL), नागपूर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

एअर इंडिया एअर सर्विस लिमिटेड नागपूर यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 145 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये ड्यूटी ऑफिसर 04 जागा, ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर 01 जागा, ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल 02 जागा, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 16 जागा, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 18 जागा, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 06 जागा, हँडीमन 98 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 3, 4, 5, 6 आणि 7 एप्रिल रोजी स्वखर्चाने मुलाखती करता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

हॉटेल आदि प्लॉट क्रमांक: 05, इंडियन ऑइल पेट्रोल पंप जवळ विमानतळ रोड नागपूर 440025

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1_N6aW60PueA5OyKkrvSct9tts_I1zGR4/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://www.aiasl.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही