Oliy Skin | उन्हाळ्यामध्ये तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Oliy Skin | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची अधिक काळजी (Skin Care) घ्यावी लागते. कारण गरम वातावरणामुळे त्वचेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोकांना घामामुळे तेलकट त्वचेच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्वचा अधिक तेलकट झाल्यामुळे डाग आणि पिंपल्स यासारख्या समस्या निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे तेलकट त्वचेच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, ही उत्पादने त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकतात.

मॉइश्चरायझर (Moisturizer-Oliy Skin)

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी त्वचेला मॉइश्चरायझ करणे खूप गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी ऑइल फ्री मॉइश्चरायझर किंवा जेलचा वापर करा. त्वचेला नियमित मॉइश्चरायझ केल्याने त्वचेला आतून पोषण मिळते आणि त्वचा निरोगी राहते.

सनस्क्रीन (Sunscreen-Oliy Skin)

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन लावणे खूप महत्त्वाचे आहे. सनस्क्रीन वापरल्याने त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून सुरक्षित राहते. उन्हाळ्यामध्ये नियमित सनस्क्रीन वापरल्याने त्वचा फ्री रॅडिकल्सपासून सुरक्षित राहते.

फेस मास्क (Face mask-Oliy Skin)

उन्हाळ्यामध्ये तेलट त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस मास्कचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही चंदन आणि मुलतानी मातीचा वापर करू शकतात. चंदन आणि मुलतानी मातीचा फेस मास्क वापरल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते. त्याचबरोबर या फेस मास्कच्या मदतीने त्वचा चमकदार होऊ शकते.

उन्हाळ्यामध्ये तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही वरील उपाय करू शकतात. त्याचबरोबर कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकतात.

नियमित तेल लावा (Apply Oil Regularly-Curly Hair)

कुरळ्या केसांना वेळोवेळी तेल लावणे खूप महत्त्वाचे आहे. नियमित तेल लावल्याने केस गळती थांबते आणि केस मजबूत होतात. तुम्ही केस धुण्याच्या एक तास आधी केसांना तेल लावू शकतात. नियमित असे केल्याने केस निरोगी आणि मजबूत राहू शकतात.

मॉइश्चरायझिंग शाम्पूने केस धुवा (Wash Hair With Moisturizing Shampoo-Curly Hair)

केसांमधील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझिंग शाम्पूने केस धुणे खूप महत्त्वाचे आहे. केस निरोगी ठेवण्यासाठी केस धुण्याच्या किमान एक तास आधी तुम्हाला केसांना तेल लावणे आवश्यक आहे. तेल लावून केस धुतल्यावर केस गळती थांबते आणि केसांच्या अनेक समस्या सहज दूर होतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.