Share

Black Salt | काळ्या मिठाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

🕒 1 min read Black Salt | टीम महाराष्ट्र देशा: काळे मीठ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काळ्या मिठामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, सोडियम आणि कॅल्शियम आढळून येते, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर काळ्या मिठाचे नियमित सेवन केल्याने अन्न पचण्यास मदत होते. काळ्या मिठाचे नियमित सेवन केल्याने वजन देखील नियंत्रणात राहू शकते. त्याचबरोबर नियमित … Read more

Published On: 

🕒 1 min read

Black Salt | टीम महाराष्ट्र देशा: काळे मीठ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काळ्या मिठामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, सोडियम आणि कॅल्शियम आढळून येते, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर काळ्या मिठाचे नियमित सेवन केल्याने अन्न पचण्यास मदत होते. काळ्या मिठाचे नियमित सेवन केल्याने वजन देखील नियंत्रणात राहू शकते. त्याचबरोबर नियमित काळे मीठ खाल्ल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

डायबिटीससाठी फायदेशीर (Beneficial for diabetes-Black Salt Benefits)

तुम्ही जर डायबेटीसचे रुग्ण असाल, तर काळे मीठ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. काळ्या मिठाच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि शरीरही निरोगी राहते. साधारण मिठापेक्षा काळ्या मिठामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते, त्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Black Salt Benefits)

काळ्या मिठाच्या सेवनाने पचनाशी संबंधित अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. काळ्या मिठाच्या सेवनाने पोट दुखी, बद्धकोष्टता, ऍसिडिटी इत्यादी समस्या सहज दूर होतात. काळ्या मिठामध्ये भरपूर प्रमाणात आयरन आढळून येते, जे छातीत होणारी जळजळ शांत करण्यास मदत करते.

ब्लड प्रेशरसाठी फायदेशीर (Beneficial for blood pressure-Black Salt Benefits)

काळ्या मिठाच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकते. काळ्या मिठामध्ये आढळणारे सोडियम क्लोराइड रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. काळ्या मिठामध्ये सोडियमचे प्रमाण खूप कमी आढळून येते, त्यामुळे काळ्या मिठाचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

काळ्या मिठाचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Bitter Gourd Benefits)

कारल्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. कारल्याच्या रसाचे सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने तुम्ही सर्दी, खोकला इत्यादी मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर नियमित या रसाचे सेवन केल्याने मेंदू निरोगी राहू शकतो.

डायबिटीससाठी फायदेशीर (Beneficial for diabetes-Bitter Gourd Benefits)

तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असाल, तर सकाळी रिकाम्या पोटी कारल्याच्या रसाचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारल्याचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. कारल्याच्या रसामध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म आढळून येतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Health

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या