Blackheads | कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या पद्धती

Blackheads | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकाला सुंदर, चमकदार आणि निरोगी त्वचा हवी असते. त्यामुळे त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य उत्पादन वापरतात किंवा ब्युटी ट्रीटमेंट घेतात. त्याचबरोबर चेहरा आणि कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करत असतात. यासाठी बहुतांश लोक पार्लरमध्ये जाऊन ब्लॅकहेड्स काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सतत पार्लरमध्ये जाणे आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. हे उपाय केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात.

मध आणि दालचिनी (Honey and cinnamon-For Blackheads)

कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी मध आणि दालचिनी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा मधामध्ये दालचिनी पावडर मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट साधारण दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हलक्या हाताने कपाळावर स्क्रब करावे लागेल. स्क्रब केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित असे केल्याने कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर होऊ शकतात.

अंडी (Egg-For Blackheads)

अंडी फक्त आपल्या आरोग्यासाठी नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी अंडी उपयुक्त ठरू शकतात. यामध्ये आढळणारे घटक कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला अंड्यामध्ये एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे ब्लॅकहेड्सवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर होऊ शकतात.

लिंबू (Lemon-For Blackheads)

ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. लिंबामध्ये आढळणारे विटामिन सी त्वचेवर साचलेली घाण काढून टाकण्यास मदत करतात. कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी लिंबाचा रस त्यावर लावावा लागेल. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवावा लागेल. नियमित असे केल्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवेल.

कपाळावरील ब्लॅकहेड दूर करण्यासाठी तुम्ही वरील उपाय करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये तेलगट त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकतात.

मॉइश्चरायझर (Moisturizer-Oliy Skin)

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी त्वचेला मॉइश्चरायझ करणे खूप गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी ऑइल फ्री मॉइश्चरायझर किंवा जेलचा वापर करा. त्वचेला नियमित मॉइश्चरायझ केल्याने त्वचेला आतून पोषण मिळते आणि त्वचा निरोगी राहते.

सनस्क्रीन (Sunscreen-Oliy Skin)

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन लावणे खूप महत्त्वाचे आहे. सनस्क्रीन वापरल्याने त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून सुरक्षित राहते. उन्हाळ्यामध्ये नियमित सनस्क्रीन वापरल्याने त्वचा फ्री रॅडिकल्सपासून सुरक्षित राहते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.