Uddhav Thackeray | ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत काय ठरलं? अंबादास दानवेंनी दिली माहिती

Uddhav Thackeray | मुंबई: आज (17 मे) ठाकरे गटाची बैठक झाली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनात ही बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची उपस्थित होती. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. बैठकीनंतर अंबादास दानवे यांनी बैठकीमध्ये झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली आहे.

आज झालेल्या बैठकीबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “मुंबईमध्ये 18 जून रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा होणार आहे. त्याचबरोबर 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन जल्लोष आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे. या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुखांच्या प्रश्नांची उत्तरं आणि शंकांचं निरसन करण्यात आलं आहे.”

“सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सत्ता संघर्षाच्या निकालाची प्रत बैठकीमध्ये जमलेल्या सर्व जिल्हाप्रमुखांना देण्यात आली आहे. यामधील मुद्दे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना जिल्हाप्रमुखांना देण्यात आल्या आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सरकारच्या विरोधात लागला आहे. तरीही ते पेढे वाटत आहेत. त्यामुळे हा निकाल तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.

“सुप्रीम कोर्टाने आपल्या बाजूने काही सकारात्मक मुद्दे दिले आहे. हे मुद्दे ठळक करून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांकडे दिली आहे. हे सर्व मुद्दे जिल्हाप्रमुखांना कार्यकर्त्यांना समजून सांगायचे आहे, असंही अंबादास दानवे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या