Sanjay Shirsat | राज्यात होणाऱ्या दंगलींमागे उद्धव ठाकरेंचा हात आहे का? संजय शिरसाटांकडून चौकशीची मागणी

Sanjay Shirsat | मुंबई: महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना घडताना दिसत आहे. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केला आहे. राज्यातील दंगली घडवण्यामागे उद्धव ठाकरे यांचा हात आहे का? एसआयटीमार्फत त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे.

2004 साली मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यात दंगली घडवण्याचा सूचना दिल्या असल्याच्या नितेश राणे यांच्या आरोपाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे. या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले आहे. शिरसाटांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

“राज्यामध्ये कारण नसताना हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. याचा आरोप राज्य शासनावर ढकलून पुन्हा हिंदू एकजूट कसे करता येईल, यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे जे कोणी हिंसाचाराच्या घटना घडवत आहे आणि ज्यांच्यामुळे या घटना घडत आहे त्यांची एसटीआयमार्फत चौकशी केली पाहिजे, असं देखील शिरसाट बोलताना म्हणाले.

“हिंसाचार घडवून आणणारा चेहरा कुठेतरी समोर आला पाहिजे. तुम्हाला सत्ता गाजवायची आहे म्हणून तुम्ही राज्यात हिंसाचार घडवून आणत आहात. मात्र, आमचे एक शिष्टमंडळ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना याबद्दल चौकशी करायला सांगणार आहे,” असंही शिरसाट म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.