Supreme Court | ‘या’ दिवशी लागू शकतो सत्तासंघर्षाचा निकाल

Supreme Court | दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालाआधी राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. अशात 10 मे नंतर हा निकाल कधीही लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्यायमूर्ती शाह 15 मे रोजी निवृत्त होणार असल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली आहे. त्याचबरोबर सत्ता संघर्षाचा निकाल 11 किंवा 12 मे रोजी लागण्याची शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. सत्ता संघर्षावर दीर्घ युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालय नक्की काय निकाल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निकालाबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. काहींच्या मते शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरतील. तर काहींच्या मते हे प्रकरण पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याची शक्यता आहे. आमदार अपात्र झाले तरी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला धोका नसल्याचे बहुतांशांकडून म्हटलं जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. मुख्यमंत्री गेले तर सरकार कोसळण्याची शक्यता असते. मुख्यमंत्र्यांना वाटलं की, आपण अपात्र ठरू शकतो तर ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात, असं विधान असीम सरोदे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या