Devendra Fadnavis | “आव्हाडांवर कारवाई केली जाईल…” ; जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात वादविवाद सुरू आहे. काही ठिकाणी या चित्रपटाचं समर्थन केलं जात आहे. तर काही ठिकाणी या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या चित्रपटाबद्दल खळबळ जनक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? (What did Jitendra Awhad say?)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “खोटारडेपणाला देखील हद्द असते. एका धर्माला आणि राज्याला बदनाम केलं जात आहे. या चित्रपटाच्या निर्मात्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे. हा चित्रपट महिलांना बदनाम करायचं काम करत आहे.”

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया (Devendra Fadnavis’ reaction)

चित्रपट निर्मात्याला फासावर लटकवलं पाहिजे या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर बोलताना ते म्हणाले, “जितेंद्र आव्हाड जर असं काही बोलले असतील तर ते अतिशय चुकीचं आहे. या प्रकारचं बोलणं बेकायदेशीर आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते अशाप्रकारे बोलतात. त्यांचे हे वक्तव्य तपासून पाहिलं जाईल. त्यामध्ये काहीही कायदेशीर आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.”

या चित्रपटाला बंदी आणि विरोध असूनही प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईमध्ये  30% अधिक वाढ झालेली दिसली आहे. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने पहिल्या विकेंडला 35.25 कोटी रुपयांची कमाई केली.

महत्वाच्या बातम्या

Back to top button