Suresh Dhas । भाजप आमदार सुरेश धस हे सतत अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी मुख्य संशयित असणाऱ्या आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) वर निशाणा साधत आहेत. यामुळे सध्या राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच आता पुन्हा एकदा सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पोलिसांचा वाटा आणि नंतर आकाचा वाटा. करुणा मुंडे किंवा डॉ. देशमुख यांच्यावर खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करायच्या. करुणा मुंडे तुमच्या सौभाग्यवती आहेत. त्या पहिल्या पत्नी आहेत, असे मी जबाबदारीने सांगतो. करुणा मुंडे (Karuna Mund) यांच्या गाडीत बुरखा घालून आलेल्या व्यक्तीने पिस्तुल ठेवले, तो संजय सानप हा पोलीस आहे,” असा दावा धस यांनी केला.
Suresh Dhas target Dhananjay Munde
पुढे ते म्हणाले की, परळी शहरातले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सर्व काही गोळा करण्याचं काम करतात. सोनी चॅनलमधले सीआयडीचे पोलीस, सावधान इंडियासारख्या लोकांची परळीला नियुक्ती करावी, खरे पोलीस अधिकारी, सीआयडी नको. सत्यमेव जयते ऐवजी ‘असत्यमेव जयते’ टाकावे, अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या :