जालना– राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र येण्याच्या चर्चांदरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य करत सांगितलं की, “शरद पवार आमच्या सोबत आले असते तर ते देशाचे राष्ट्रपती झाले असते.”
आठवले म्हणाले, “शरद पवार साहेबांनी जर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला पाठिंबा दिला असता, तर ते आज राष्ट्रपतीच्या पदावर विराजमान झाले असते. अजूनही वेळ गेलेली नाही. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन जर एनडीएला पाठिंबा देत असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत करतो.”
Sharad Pawar Could Be President If He Joined NDA
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही भाष्य केलं. “उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले, तर महाविकास आघाडीत फूट पडेल. त्याचा फायदा आम्हाला होईल. पण मला वाटतं ते दोघं एकत्र येणार नाहीत,” असं आठवले म्हणाले.
तसेच, “जर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील, तर आम्हालाही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत यावं लागेल,” असं आठवले यांनी स्पष्ट केलं. मात्र, युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठा बदल होणार नाही, असंही म्हटलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- पाकव्याप्त काश्मीर भारताला मिळालाच पाहिजे; गरज भासल्यास पाकिस्तान ताब्यात घ्या – रामदास आठवले
- शिवसेना भाजपच्या दावणीला बांधण्यासाठीच हा निर्णय; शिंदेंच्या शिवसेनेत घमासान
- राज-उद्धव युतीत संजय राऊत अडथळा; प्रकाश महाजन यांचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











