Dhananjay Munde । मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे (Karuna Munde) यांचे आरोप वांद्रे कोर्टाने (Bandra Court) मान्य केले असून त्यांनी याप्रकरणी धनंजय मुंडेंना दोषी ठरवले आहे. त्यांना दरमहा 1 लाख 25 हजार रुपये पोटगी म्हणून करून मुंडेंना देण्याचे आदेश दिले आहेत. हा धनंजय मुंडेंसाठी धक्का मानला जात आहे.
कोर्टाने दोषी ठरवताच मुलगा सिशिव मुंडे (Seeshiv Munde) त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. एक पोस्ट करत त्याने करुणा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. “मी श्रीशीव धनंजय मुंडे, मीडियासाठी माझं कुटुंब मनोरंजनाचं साधन बनले असल्याने मला बोलणं गरजेचं वाटत आहे. जरी माझे वडील सर्वोत्कृष्ट नसले तरी त्यांनी माझ्या आईसारखा कधीच त्रास दिला नाही. याउलट आमच्या आईला मानसिक धक्के बसले असल्याने तिने आम्हाला त्रास दिला आहे. मी, माझी बहीण आणि माझ्या वडिलांसोबत घरगुती हिंसाचार झाला आहे,” असा दावा सिशिव मुंडे याने केला आहे. (Seeshiv Munde vs Karuna Munde)
“माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास सहन होत नसल्यानंतर ते तिला सोडून गेले. त्यानंतर तिने मला आणि माझ्या बहिणीला घर सोडून जायला सांगितले. कारण तिला आमच्याबद्दल काही देणंघेणं नसून 2020 या वर्षापासून आमचे वडील आमची काळजी घेत आहेत. माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत, तरीदेखील तिने घराचे कर्जाचे हप्ते न भरण्याचा निर्णय घेतला. केवळ सूड उगवण्यासाठी ती असे करत आहे,” असा आरोप देखील सिशिव मुंडे याने केला आहे.
Seeshiv Munde ( Dhananjay Munde Son ) on Karuna Munde
दरम्यान, वांद्रे कोर्टाच्या निकालावर दिलेल्या सिशिव मुंडे याच्या प्रतिक्रियेची चर्चा होऊ लागली आहे. मुलानेच धनंजय मुंडे यांची बाजू घेतल्याने करून मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. सिशिव मुंडेच्या आरोपावर करुणा मुंडे काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :