Prakash Ambedkar | “कोंबड्या खा, बकरी खा, पण कमळाला काय मतं देऊ नका”; प्रकाश आंबेडकरांचं मतदारांना अवाहन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prakash Ambedkar | बुलढाणा : भाजपला सत्तेबाहेर करण्यासाठी राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने देखील महाराष्ट्रात ७ ठिकाणी संयुक्त सभा घेण्याचे आयोजन केले आहे. या प्रत्येक सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या ठाकरे गटातील एक नेता सभेची जबादारी घेणार आहे. यातच आता बहुजन वंचित आघाडीने देखील पुढाकार घेत काही ठिकाणी सभा घेताना दिसत आहेत. अशातच आता बुलढाणा येथे बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सभा घेतली यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर शरसंधाण साधलं आहे.

“लोकशाही वाचवायची असेल तर भाजपला मत देऊ नका”

“काहीही करा… निवडणुकीच्या वेळी उमेदवारांनी दारू दिली तर मस्तपैकी प्यायची, कोंबड्या दिल्या तर खायच्या, बकरे दिले तरी तेही खायचे. पण कमळाला मतदान करायचं नाही. जर तुम्हाला लोकशाही वाचवायची असेल तर भाजपला मत देऊ नका. देशातली लोकशाही वाचली पाहीजे असं तुम्हाला वाटत असेल तर कमळातला स्वाद खाऊन टाका पण त्यांना मत देऊ नका”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Prakash Ambedkar Criticize BJP

“मला १०० टक्के खात्री आहे कि, मुस्लिम समाज भाजपला कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे, जर त्यांनी भाजपला मत दिलं तर गावागावात गोध्रा जळीत हत्याकांड झाल्याशिवाय राहणार नाही”, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वी युती केली होती. यामुळे आता आगामी काळातील निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेचा ठाकरे गट एकत्र पहायला मिळतील.

महत्वाच्या बातम्या-