Amruta Fadnavis | ‘मॅडम चतुर…औकात..’; १ कोटी ऑफरवरुन अमृता फडणवीस-प्रियंका चतुर्वेदींमध्ये ट्विटरवॉर

Amruta Fadnavis | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला असल्या प्रकरणी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी छापल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

विविध गुन्ह्यात फरार असलेला माजी नगरसेवक अनिल जयसिंघानी यांच्यावरील गुन्हे आणि आरोप मागे घेण्यासाठी जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा हिने थेट अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी गुरुवारी दुपारी पोलिसांनी तिला अटक केली आहे.

या प्रकरणावरुन आता ठाकरे गटाच्या नेत्या, खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हल्लाबोल केला होता. प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटला आता अमृता फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावरुन अमृता फडणवीस आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्विटरवॉर पहायला मिळालं आहे.

Twitter War between Amruta Fadnavis And Priyanka Chaturvedi

प्रियंका चर्तुर्वेदी यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या संबंधित या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एका गुन्हेगाराच्या मुलीला मुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश मिळतो. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी 5 वर्षाहून अधिक काळ मैत्री होते. तसेच प्रमोशनच्या नावाखाली बायकोला दागिने, घालायला कपडे, तिच्याच गाडीत तिच्यासोबत हिंडायला मिळते, असे देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेतील तंतोतंत वक्तव्य प्रियंका चर्तुर्वेदी यांनी सुरुवातीला ट्वीट केले आहे.

अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर 

“मॅडम चतुर, हीच तुमची औकात” असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “मॅडम चतुर- आधी तुम्ही खोटा दावा केला होता की, मी अ‌ॅक्सिस बँकेला फायदा करून दिला आणि आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात? अर्थात- तुमचा विश्वास संपादन केल्यावर, जर कोणी-पैसे देऊन केसेस बंद करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधला असता तर तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या मालकाद्वारे मदत केली असती- तीच तुमची औकात आहे” असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.