Rahul Gandhi | “मी भाजपच्या आरोपाला संसदेतच उत्तर देणार”; राहुल गांधींचं ‘त्या’ भाषणाबाबत वक्तव्य

Rahul Gandhi | नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडनमध्ये (London) भाषण केले होते. त्यावेळी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन भारतात भाजपने गोंधळ घातला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले, आणि माफी मागावी अशी मागणीही केली आहे. राहुल गांधी यांनी आज याबाबत पत्रकार घेत भाजपच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. अदानी (Adani) आणि बीबीसीच्या डॉक्युमेंटरीवरुन (BBC) भाजपवर टीकास्त्र सोडलेय. ‘अदानीच्या मुद्द्यावर भाजप घाबरले आहे’, असा घणाघात राहुल गांधींनी केला आहे.

Rahul Gandhi talk about his Landon Speech

“आज संसदेत गेलो आणि लोकसभा अध्यक्षांना बोलण्याची परवानगी मागितली. सरकारमधील चार मंत्र्यांनी माझ्यावर आरोप केले होते, त्यामुळे मी संसदेतच माझं मत मांडणार आहे. भाजपच्या आरोपाला संसदेतच उत्तर देणार आहे. शुक्रवारी मला बोलू देतील अशी आशा आहे. मी खासदार आहे अन् संसदेतच उत्तर देणार आहे”, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.

“मी सभागृहात पोहचल्यानंतर एका मिनिटात लगेच कामकाज तहकूब करण्यात आले. अदानीच्या मुद्द्यावरुन लक्ष दुसरीकडे हटवण्याचं काम मोदी सरकार करत आहे. काही दिवसांपूर्वी मी सभागृहात मोदी आणि अदानी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत भाषण केले होते. पण त्या भाषणातील भाग काढण्यात आला. सार्वजनिक रेकॉर्डमधून काढण्यात यावे, असे भाषणात मी काहीही चुकीचं बोललो नव्हतो”, असे स्पष्टीकरण राहुल गांधींनी केले आहे.

‘I will answer BJP’s allegation in Parliament’

“अदानी मुद्यावर सरकार आणि मोदी घाबरले आहेत, त्यासाठी त्यांनी हा तमाशा केला. मला संसदेत बोलू देतील असे वाटत नाही. मोदी आणि अदानी यांच्यात काय संबंध आहेत? हा प्रमुख प्रश्न आहे”, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.