Neelam Gorhe | मुंबई: मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. अशात काल मणिपूरमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये काही लोक महिलांवर अत्याचार करताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
आज विधिमंडळ अधिवेशनात माणिकपूरच्या मुद्द्यावरून चांगलाच गोंधळ झाला असल्याचं दिसून आलं आहे. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर अमित शाह बोलत नाही.
मणिपूर देशात आहे की देशाच्या बाहेर आहे हे कोणीतरी एकदा स्पष्ट सांगावं, असं काँग्रेस आमदार अशोक उर्फ भाई जगताप यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर (Neelam Gorhe) सभागृहात विरोधकांनी गोंधळ करायला सुरुवात केली.
Some topics are beyond politics – Neelam Gorhe
विरोधकांचा गोंधळ सुरू असताना उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी त्यांना स्पष्ट भाषेत खडसावलं आहे. त्या म्हणाल्या, “हातरज प्रकरण, निर्भया प्रकरण किंवा मणिपूर प्रकरणाबाबत मी निवेदन केलं आहे. काही विषय हे राजकारणाच्या पलीकडचे असतात. त्यातलाच हा एक विषय आहे. त्यामुळे या विषयाचं राजकारण करू नका.”
“नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काही विषय राजकारणाच्या पलीकडे ठेवले आहेत. त्यातलाच हा एक विषय आहे. यापुढे अशा काही घटना घडल्या तर कठोर शिक्षा केली जाणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात दखल घेतली आहे”, असही त्या (Neelam Gorhe) यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- Gulabrao Patil | “अरे हा शेतकऱ्याचा पोट्टा…”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात
- Devendra Fadnavis | भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा केला जाईल – चंद्रशेखर बावनकुळे
- Prakash Ambedkar | “सरकारला आम्ही मागेही इशारा दिला होता आज पुन्हा देतोय…”; मणिपूर प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
- Chitra Wagh | “वेदना जाणवून थांबून जाणे किंवा नुसते विव्हळत…”; मणिपूर प्रकरणावर चित्र वाघांची प्रतिक्रिया
- Praniti Shinde | ” मोदी सत्तेत आल्यापासून महिलांच्या विरोधात…”; मणिपूर प्रकरणावरून प्रणिती शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल