Devendra Fadnavis | मुंबई: उद्या म्हणजेच 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा देखील वाढदिवस आहे. मात्र, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेमुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस राज्यभर ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितलं आहे.
माध्यमांशी संवाद साधत असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी अजूनही बचाव कार्य सुरू आहे.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्यास ठरवलं आहे. त्याचबरोबर राज्यात कुठेही त्यांच्या वाढदिवसाचे पोस्टर, बॅनर्स, होल्डिंग लावले जाणार नाही.”
No cultural programs will be organized on the occasion of Devendra Fadnavis’ birthday
पुढे बोलताना ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार नाही.
त्याचबरोबर कुणीही त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन फलकाची किंवा इतर बॅनरबाजी करू नये. नैसर्गिक आपत्ती काळात उपचारासाठी राज्यात 23 जुलै 2023 पासून ते 22 जुलै 2023 पर्यंत राज्यात 50 हजार रुग्ण मित्र तयार केले जाणार आहे.”
“भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, अन्नधान्य वाटप शिबिर, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाणार आहे”, असही ते यावेळी म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole | विधानसभा विरोधी पक्षनेता कोण? नाना पटोलेंनी स्पष्ट सांगितलं
- Prakash Ambedkar | “सरकारला आम्ही मागेही इशारा दिला होता आज पुन्हा देतोय…”; मणिपूर प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
- Chitra Wagh | “वेदना जाणवून थांबून जाणे किंवा नुसते विव्हळत…”; मणिपूर प्रकरणावर चित्र वाघांची प्रतिक्रिया
- Eknath Shinde | “इर्शाळवाडी दुर्दैवी घटनेत 12 जणांचा मृत्यू तर…”; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
- Kirit Somaiya | व्हिडिओवरून वाद सुरू असताना किरीट सोमय्या अचानक दिल्ली दौऱ्यावर; घेतली भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट