Share

Kirit Somaiya | व्हिडिओवरून वाद सुरू असताना किरीट सोमय्या अचानक दिल्ली दौऱ्यावर; घेतली भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट

Kirit Somaiya | नवी दिल्ली: भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्याचबरोबर या प्रकरणावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं होतं. सध्या राज्याच्या राजकारणात हा मुद्दा तापलेला असताना किरीट सोमय्या काल अचानक दिल्लीत पोहोचले. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यानंतर राजकीय वर्तुळात … Read more

Published On: 

Kirit Somaiya | नवी दिल्ली: भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली होती.

त्याचबरोबर या प्रकरणावरून विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं होतं. सध्या राज्याच्या राजकारणात हा मुद्दा तापलेला असताना किरीट सोमय्या काल अचानक दिल्लीत पोहोचले. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Kirit Somaiya met senior BJP leaders

व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आरोप होत असताना ते अचानक दिल्लीत पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे.

या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. संसदेच्या पहिल्याच दिवशी किरीट सोमय्या संसद परिसरात दिसल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ झाली आहे.

राजकारणात भ्रष्टाचाराविरोधात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मात्र, एका व्हिडिओनंतर किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका आक्षेपार्ह व्हिडिओमुळे विरोधकांनी त्यांना घेरलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आत्तापर्यंत भाजपच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत.

त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या विरोधात सीबीआय, ईडी, आयकर विभागाकडे भ्रष्टाचाराचे आरोप करत तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही