Share

Nana Patole | “सरकारने योग्य वेळी दखल घेतली नाही म्हणून…”; इर्शाळवाडी घटनेवरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

🕒 1 min read Nana Patole | रायगड: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळली (Irshalgad Landslide) आहे. या घटनेनंतर रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. काल (20 जुलै) घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) अनेक नेते घटनास्थळी दाखल झाले होते. त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील दाखल झाले आहे. त्यानंतर नाना पटोले यांनी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Nana Patole | रायगड: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळली (Irshalgad Landslide) आहे. या घटनेनंतर रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

काल (20 जुलै) घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) अनेक नेते घटनास्थळी दाखल झाले होते. त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील दाखल झाले आहे. त्यानंतर नाना पटोले यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

The government has not taken notice at the right time – Nana Patole

माध्यमांशी संवाद साधत असताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “इर्शाळवाडी येथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं असतं तर नाहक बळी गेलेच नसते. सरकारनं योग्य वेळी दखल घेतलेली नाही.

त्यामुळे या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे. आता तरी सरकारनं जलद गतीनं हालचाली सुरू करायला हव्या. लोकांना सरकारनं आवश्यक ती मदत वेळेत करायला हवी.”

दरम्यान, इर्शाळवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळं या ठिकाणी बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहे. म्हणूनच बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा आज सकाळी 6.30 वाजल्यापासून बचावकार्य (Nana Patole) सुरू झालं आहे.

या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली (Nana Patole) आहे. तर 103 लोकांना वाचवण्यात यश आलं  आहे. त्याचबरोबर 100 पेक्षा अधिक लोक ढिगार्‍याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर इर्शाळवाडीतील 48 घरांपैकी 17 घरं या घटनेत गाडली गेली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही