Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: काल रात्री राज्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या ठिकाणी ही घटना घडली आहे. इर्शाळवाडी येथे पावसामुळे दरड कोसळली आहे. या दरडीखाली अख्खी वस्ती दबली गेली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ झाली आहे.
रायगड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या दुर्दैवी घटनेवर राज ठाकरे यांनी ट्विट करत खंत व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनावर खोचक टीका केली आहे.
कुठे दरड कोसळू शकतात याचा अंदाज जर प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
ट्विट करत राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं.”
रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 20, 2023
I didn’t want to talk about this immediately after such incidents happened – Raj Thackeray
“खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन?
असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा”, असही ते (Raj Thackeray) या ट्विटमध्ये म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | माझा वाढदिवस साजरा करू नका; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा
- Nana Patole | “विरोधात असताना छगन भुजबळांचा घसा कोरडा व्हायचा आणि आज…”; नाना पटोलेंचा छगन भुजबळांवर घातक वार
- Jitendra Awhad | मी घरं बांधून दिली तशी तुम्ही देणार का? इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर जितेंद्र आव्हाडांचा राज्य शासनाला खडा सवाल
- Ajit Pawar | जखमींवर सरकारी खर्चानं उपचार तर मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा
- Nilesh Rane | फक्त फोन करून किंवा सूचना देऊन काही होत नाही; निलेश राणेंची अजित पवारांवर खोचक टीका