Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
Ajit Pawar is the future Chief Minister of the state – Sanjay Raut
उद्या (22 जुलै) रोजी अजित पवारांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यानिमित्तानं त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मी तुम्हाला खात्रीने सांगतो की अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री आहे.
लवकरच ते मुख्यमंत्री होणार आहेत. कारण मलाही राजकारण कळतं, काय घडामोडी घडत आहेत त्या कळतात. अजित पवारांचे भविष्य लवकरात लवकर जवळ येत आहे.
ते लवकरच मुख्यमंत्री होणार आहे. त्यांच्या वाढदिवसाला जर भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले असतील, तर ते सत्य आपण स्वीकारायला हवं.”
यावेळी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मणिपूर हिंसाचार प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मणिपूर हिंसा प्रकरणावर युरोपियन पार्लमेंटमध्ये चर्चा होताना दिसत आहे. मात्र या विषयावर आपल्या पार्लमेंटमध्ये चर्चा नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 दिवसानंतर पार्लमेंटच्या बाहेर या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारनं माणिपूरच्या कायदे व्यवस्थेकडं लक्ष द्यायला हवं. केंद्र सरकार मणिपूरची परिस्थिती नियंत्रणात आणू शकत नाही. त्यांचा मोठं अपयश आहे.”
बृहन्मुंबई महानगरपालिका कोविड घोटाळा प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारचा कोविड घोटाळा झालेला नाही.
सीबीआय आणि ईडी बीजेपीच्या म्हणण्यानुसार चालतात. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईमध्ये कोरोनासोबत युद्ध केलं आहे. या काळात आम्ही लोकांना योग्य ती सेवा पुरवली आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole | “सरकारने योग्य वेळी दखल घेतली नाही म्हणून…”; इर्शाळवाडी घटनेवरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल
- Ajit Pawar | शरद पवार गटाला मोठा धक्का! नागालँडमधील आमदारांनी अजित पवारांना दर्शवला पाठिंबा
- Aditya Thackeray | सरकारला ही दुर्घटना टाळता आली असती असं वाटतं का? इर्शाळवाडी घटनेवरून आदित्य ठाकरेंचा सवाल
- Nana Patole | “विरोधात असताना छगन भुजबळांचा घसा कोरडा व्हायचा आणि आज…”; नाना पटोलेंचा छगन भुजबळांवर घातक वार
- Sharad Pawar | “माझी राज्य शासनाला विनंती आहे की…”; इर्शाळवाडी घटनेवर शरद पवारांची प्रतिक्रिया